प्रवेशासंबंधी नियम आणि कार्यपध्दती

प्रवेश प्रक्रिया, विद्यार्थ्यांचे हक्क, त्यांच्या जबाबदाऱ्या, महाविद्यालयातील सुविधा इ. बाबत अधिकृतता असलेली सविस्तर माहिती महाविद्यालयाच्या वेबसाइटवर प्रदर्शित माहिती-पुस्तिका 2020-21/Prospectus 2020-21 यामध्ये पाहा. जागेअभावी प्रवेश अर्जासोबत फक्त संक्षिप्त स्वरूपातील नियम, कार्यपध्दती नमूद केली आहे.


 • FY, SY, BA/B.Sc/B.Com/BMS आणि M.A. / M.Sc. Part-I या वर्गांमध्ये 2019-20 मध्ये प्रविष्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांना यावर्षी S.Y, T.Y. या वर्गांकरिता थेट प्रवेश दिला जात आहे.

 • अशा विद्यार्थ्यांना FY, SY या वर्गांमध्ये असताना ज्या विषयांसाठी ATKT लागलेली आहे, त्यांनी ते विषय जुलै 2020 मधील परीक्षेपासून पुढील नियमबध्द संधींमध्ये सोडविणे अनिवार्य आहे.

 • F.Y.,S.Y., T.Y. आणि M.A. / M.Sc. या वर्गांसाठी जुलै किंवा ऑगस्ट 2020 मध्ये प्रवेश घेण्यासाठी फक्त ऑनलाइन पध्दतीचा अवलंब कोरोना समस्येमुळे केला जाईल.
  सर्व तपशील भरून फॉर्म सबमिट केल्यापासून 24 तास मुदतीमध्ये कार्यालय अर्जांची छाननी करेल. त्यानंतर अर्ज मंजूर/नामंजूर झाल्याचा निर्णय अर्जदार विद्यार्थी लॉग-इन वर पाहू शकतील. अर्ज मंजूर झाले असतील त्यांना त्याच ठिकाणी फी भरण्याची सूचना मिळेल. मुदतीमध्ये वैध फी भरणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश कायम झाल्याचा संदेश त्याच ठिकाणी प्रदर्शित होईल. फी भरून झाल्यावर फॉर्मची प्रत वेबसाईटवरून डाऊनलोड करावी.

 • प्रवेश अर्जामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःच्या नेहमीच्या वापरातील मोबाईल फोन क्रमांक आणि ई-मेल आय.डी. देणे बंधनकारक आहे. सायबर कॅफे चालक, नातेवाईक यांचे किंवा वापरात नसलेले फोन नंबर, ई-मेल आय्.डी. दिल्यास दंडात्मक कारवाई होईल.
  विद्यापीठ, महाविद्यालयाकडून महत्त्वाच्या सूचनांचे संदेश प्रवेश अर्जातील नमूद क्रमांकावर कळविले जातील. अयोग्य क्रमांकामुळे हे संदेश न पोचल्यास होणाऱ्या दुष्परिणामास विद्यार्थी जबाबदार राहतील. आपला ई-मेल आय्.डी. आणि पासवर्ड कायम लक्षात ठेवावा.

 • विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचे सुध्दा वैध, सततच्या वापरातील मोबाईल क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे. हे क्रमांक पुढील तीन वर्षे कायम ठेवणे बंधनकारक आहे.

 • वाहतूक, संचारावरील बंधने उठल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे दाखल करण्याबाबत सूचना दिली जाईल.
 • स्कॉलरशिप, परीक्षा, आय-कार्ड, इ. सर्व महत्त्वाच्या सूचनांसाठी विद्यार्थ्यांनी सातत्याने नोटीस बोर्ड, वेबसाइट पाहण्याची सवय लावून घ्यावी.